पंजाबमध्ये काँग्रेसची ताकद वाढली

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

चंडिगड - पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

चंडिगड - पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

कॉंग्रेसमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये शिरोमणी अकाली दलाचे नेते अताम नागर आणि आमदार सिमरजित सिंग यांच्या जवळचे कमलजित सिंग करवाल आणि आम आदमी पक्षाच्या कार्य समितीचे माजी सभासद यामिनी गोमर यांचा समावेश आहे. आपचे अन्य एक नेते प्राप्तिकर विभागाचे माजी मुख्य आयुक्त एल. आर. नायर आणि पक्ष निरीक्षक गगन साहनी यांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रसंगी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, की हे सर्व नेते बिनशर्तपणे कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत.

कॉंग्रेसमध्ये आज सहभागी झालेल्या नेत्यांचा त्यांच्या पक्षाकडून आणि त्यांच्या अजेंड्यामुळे भ्रमनिरास झाला आहे, असे म्हणत अमरिंदर सिंग यांनी या नेत्यांचे पक्षात स्वागत केले. ते म्हणाले, की या नेत्यांमुळे कॉंग्रेसची ताकद वाढली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल. करवाल यांनी दिल्लीत अमरिंदर सिंग यांची भेट घेतली होती. ते 2007 पासून शिरोमणी अकाली दलामध्ये होते.

केजरीवाल आणि आपच्या दलित विरोधी, शीख विरोधी आणि पंजाब विरोधी धोरणांवर यामिनी यांनी या वेळी उघडपणे टीका केली. त्या म्हणाल्या, की आपने पंजाबच्या लोकांना खोटी आश्‍वासने दिली आहेत. यामिनी यांनी 2014 मध्ये आपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविली होती.

देश

बंगळूर - गरिबांमधील गरिबांना परवडेल अशा दरात अन्न पुरविण्यासाठी "इंदिरा कॅंटिन'चे...

05.36 PM

गोरखपूर - नेपाळमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उत्तर प्रदेशमधील रापती व रोहिणी...

04.09 PM

नवी दिल्ली - भारत-चीन सीमारेषेवरील पूर्व लडाख भागामध्ये भारतीय लष्कर व चिनी...

02.24 PM