पंजाब : ४२४ सेलिब्रिटींना पुन्हा सुरक्षा द्या; HC चे आदेश

bhagwant maan
bhagwant maan sakal

चंदीगड : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Mosse wala) यांच्या हत्येनंतर (Murder) पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंजाब सरकारने एक दिवस आधी सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab Haryana High Court) आप सरकारला 424 सेलिब्रिटिंना पुन्हा सुरक्षा बहाल करण्याचे आदेश दिले आहेत. पंजाबमधील व्हीव्हीआयपी सुरक्षा काढून घेण्याबाबत पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत. ((Punjab Haryana High Court On VIP Security )

bhagwant maan
सिद्धू मुसेवालाच्या विरहात लाडक्या कुत्र्यांनी सोडलं खाणं-पिणं

पंजाबमधील व्हीव्हीआयपी सुरक्षा काढून घेण्याबाबत पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. मागील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने सरकारकडून उत्तर मागितले होते. त्यावर आज सुनावणी पार पडली. ज्यात उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला 424 सेलिब्रिटिंना 7 जून पासून पुन्हा सुरक्षा बहाल करण्याचे आदेश दिले आहेत. पंजाबमध्ये, अलीकडेच सुरक्षा पुनरावलोकनानंतर 424 जणांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. गायक सिद्धू मुसेवाला हे देखील त्यापैकीच एक होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर भगवंत मान सरकार यांच्यावर चौफेर टीका झाली आणि प्रकरण कोर्टात पोहोचले.

bhagwant maan
दिल्लीचे दाऊद: सिद्धूच्या मारेकऱ्याला बदल्याची धमकी देणारी बवाना गँग काय आहे?

मुसेवाला हत्येची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करा; कुटुंबियांचे शहांना पत्र

पंजाब काँग्रेसचे नेते आणि प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose wala) यांच्या हत्येची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेतर्फे (Central Agency) करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुसेवाला यांच्या कुटुंबियांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत (Gajendra Shekhawat) यांनी ही माहिती दिली आहे.

bhagwant maan
Sidhu Moose Wala Murder : कंगना भडकली, पंजाब सरकारवर साधला निशाणा

दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पंजाब सरकारकडून बुधवारी विशेष तपास पथकाची आणि एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर आज या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनीही हस्तक्षेप करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर सिद्धू मुसेवाला (Sidhu MooseWala) यांच्या हत्येप्रकरणी (Murder) पोलिसांनी एकाला अटक केली असून, आरोपीला 5 दिवसांच्या पोलीस कोठडी पाठवण्यात आले आहे. मनप्रीत असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून पंजाब पोलिसांनी त्याला हत्येच्या एक दिवसानंतर उत्तराखंडमधून ताब्यात घेतले होते. याप्रकरणात मनप्रीतची भूमिका नेमकी काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com