'पुष्पा' पाहिला अन् डान्सच्या नादात झाले झॉम्बी; वरातीचा व्हायरल VIDEO

Video : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.
Pushpa
Pushpa Team esakal

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाचा फॅड अजूनही लोकांच्या मनातून संपलेला दिसत नाहीये. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच, त्यातील गाणी आणि काही डायलॉग्सने लोकांची मन जिंकली आहेत. या चित्रपटानं अशी जादू निर्माण केलीये, की प्रत्येकजण चित्रपटाच्या गाण्यांवर आणि डायलॉगवर रील (Reel) बनवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ही गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लग्न असो वा पार्टी, सगळीकडेच लोक श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसत आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

Pushpa
'तो आता खूप बदललाय'; भन्साळींचे 'या' अभिनेत्यासोबत काम करण्याचे संकेत

हा व्हिडिओ एका लग्नाच्या वरातीमधील असून, त्यामध्ये सर्व वराती श्रीवल्ली गाण्यावर एकत्र नाचताना दिसत आहेत. नाचताना सगळ्यांचीच अवस्था खतरनाक झालेली झाली दिसतेय. व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकता की श्रीवल्ली गाणं वाजतंय. सर्वजण या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. सर्वजण अल्लू अर्जुनच्या डान्स स्टेप्सची कॉपी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com