भारताविरोधी घोषणा देणाऱ्यांना चोप देऊ- आर. के. सिंग

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

आरा (उत्तर प्रदेश)- सध्या काही जण भारतविरोधी घोषणा देत आहेत. "भारत तेरे टुकडे कर देंगे...' अशी घोषणा कोणी देत असल्यास शांत बसणाऱ्यांपैकी आम्ही नाही. आम्ही राष्ट्रवादी असून, कोणी अशा भारतविरोधी घोषणा देताना आढळल्यास आम्ही त्याला चोप देऊ, असे माजी केंद्रीय गृहसचिव आणि खासदार आर. के. सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या वेळी त्यांनी "जेएनयू'मध्ये मागील वर्षी झालेल्या कार्यक्रमात झळकलेल्या भारतविरोधी फलकांचा उल्लेख केला नाही. मात्र, त्यांचा रोख या कार्यक्रमाकडेच होता. येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे पुलाच्या पाहणीसाठी ते आले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांच्या निवडीबाबत ते म्हणाले, ""ते एक चांगले व्यक्ती आणि राष्ट्रवादी आहेत.''