राहुल गांधींना वाढदिवसानिमित्त मोदींकडून शुभेच्छा

वृत्तसंस्था
रविवार, 19 जून 2016

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज (रविवार) त्यांच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दिर्घायुष्य व निरोगी आयुष्य लाभो हि माझी प्रार्थना. याबरोबरच राहुल गांधी यांना काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांसह भाजपच्याही काही नेत्यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

राहुल गांधी आज सकाळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर काँग्रस मुख्यालयात त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांच्यापुढे पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे लक्ष्य असणार आहे.

Web Title: rahul