अर्थव्यवस्था भक्कम तर मोदी अद्वितीय

rahul-bajaj
rahul-bajaj

दावोस (स्वित्झर्लंड) - ""आमची अर्थव्यवस्था भक्कम आहे. आम्हाला काही अडचणी जरूर आहेत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्वितीय आहेत,'' असे मत प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी येथे सोमवारी व्यक्त केले.

दावोस येथे "जागतिक आर्थिक मंचा'च्या 48व्या वार्षिक परिषदेसाठी ते येथे आले आहेत. या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी गौरवोद्‌गार काढले. ते म्हणाले, ""देशाची तुलना एखाद्या व्यक्तीशी मला करायची नाही. आम्हाला अडचणी आहेत; पण आपली मोठी लोकसंख्या ही 35 वर्षे वयोगटाखालील आहे. आम्ही त्यांना शिक्षण आणि कौशल्य विकास करण्याची संधी दिली तर देशाला त्याचा मोठा लाभ होईल.''

तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांनी दावोस परिषदेला गांभीर्याने घेतले नव्हते, अशी टीकाही बजाज यांनी या वेळी केली. माजी पंतप्रधान देवेगौडा हे 21 वर्षांपूर्वी दोवोसला आले होते; पण दुर्दैवाने ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह येथे आले होते. यामुळेच कदाचित त्या वेळी योग्य गोष्टी झाल्या नाहीत, अशी टीका त्यांनी केली. ही परिषद म्हणजे काही सहल नसते तर अत्यंत महत्त्वाची असून व गंभीरपणे घ्यायची बाब आहे, असे ते म्हणाले. झाले गेले, आता पंतप्रधान मोदी येथे येत आहे, याचा आम्हाला आनंद असल्याचेही बजाज यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे दावोस येथील परिषदेसाठी रवाना झाले. ते मंगळवारी (ता. 23) परिषदेत भाषण करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दावोस परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले. या परिषदेदरम्यान ते जागतिक पातळीवरील विविध उद्योग; तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांनी चर्चा करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com