सत्ता मिळेपर्यंत संघाने तिरंग्यास वंदन केलेच नाही: राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

संघाने देशाची सत्ता हाती येईपर्यंत कधीच तिरंग्यास वंदन केले नाही. एक व्यक्ती एक मत, अशी या देशाच्या राज्यघटनेची रचना आहे. मात्र ही राज्यघटना बदलण्याचा संघाचा डाव आहे

नवी दिल्ली - "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाची सत्ता हाती येईपर्यंत कधीच तिरंग्यास वंदन केले नाही,' असा आरोप कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) केला. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान राहुल बोलत होते. राहुल यांनी यावेळी संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेषत्वे लक्ष्य केले.

राहुल म्हणाले -

  • संघ आणि आमच्यामध्ये फरक हाच आहे, की आम्ही म्हणतो आम्ही या देशाचे आहोत; आणि संघ म्हणतो हा देश त्यांचा आहे.
  • संघाने देशाची सत्ता हाती येईपर्यंत कधीच तिरंग्यास वंदन केले नाही
  • एक व्यक्ती एक मत, अशी या देशाच्या राज्यघटनेची रचना आहे. मात्र ही राज्यघटना बदलण्याचा संघाचा डाव आहे
  • हा देश 15-20 उद्योगपतींच्या मालकीचा आहे, अशी संघाची धारणा आहे. भारतावर या 15-20 जणांनीच राज्य करावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्याकडून पंतप्रधानांच्या मार्केटिंग धोरणाची अधिक जाहिरात करण्यात येईल. मोदी यांच्याकडून देशातील प्रत्येक संस्थेवर संघाची ही विचारसरणी लादण्यात येत आहे.
  • संघाने हा देश आमचा आहे; या देशातील नागरिकांचा नव्हे, असे गुजरातमधील दलितांना सांगितले आहे.

या कार्यक्रमास माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासहित कॉंग्रेसमधील इतर ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. राहुल यांच्या या आरोपांवर भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जान्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Rahul Gandhi criticizes Narendra Modi and RSS