मोदीजी, हा खोडसाळ आणि बालिशपणा : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

''प्रिय पंतप्रधान, तुम्ही आज पेट्रोल आणि डिझेलचे दर 1 पैशाने कमी केले, 1 पैसा? जर हा तुमचा विचार असेल तर हा एक खोडसाळ आणि बालिशपणाचा आहे. मागील आठवड्यात मी दिलेले आव्हानाशी हे योग्य नाही''. 

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : पेट्रोलचे दर 1 पैशाने कमी झाल्याचे समजल्यानंतर विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पेट्रोलच्या दर कपातीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरून निशाणा साधला. ते म्हणाले, ''पेट्रोलचे दर कमी करण्याचा हा तुमचा विचार असेल तर हा खोडसाळ आणि बालिशपणा आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

पेट्रोलचे दर 60 पैशांनी कमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही तासांतच पेट्रोलचे दर 60 पैसे नाही तर 1 पैशाने स्वस्त झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच 'प्रिंटिंग मिस्टेक'मुळे असे झाल्याचे स्पष्टीकरण इंडियन ऑईलकडून देण्यात आले. त्यावर राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हणाले, ''प्रिय पंतप्रधान, तुम्ही आज पेट्रोल आणि डिझेलचे दर 1 पैशाने कमी केले, 1 पैसा? जर हा तुमचा विचार असेल तर हा एक खोडसाळ आणि बालिशपणाचा आहे. मागील आठवड्यात मी दिलेले आव्हानाशी हे योग्य नाही''. 

Web Title: Rahul Gandhi Criticizes PM Narendra Modi