राहुल म्हणाले 'केम छो' अन् जनता म्हणाली...

Rahul Gandhi
Rahul Gandhi

रामपूर - गुजरातच्या दिन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) सभेला संबोधित करताना गुजरातीतून 'केम छो' असे विचारल्यानंतर जनतेतूनही 'गाडो थई छो' असे उत्तर आले. 

गुजरातमध्ये सध्या सोशल मिडीयावर विकासच्या नावाने जोरदार चर्चा सुरु आहे. विकास गाडो थई छो अभियान सुरु असून, सत्ताधारी भाजपला अडचण निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांनीही या भाजपविरोधी मोहिमेचा आधार घेत विकास वेडा झाला आहे, असे टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांनी उपस्थित नागरिकांना विचारले हा विकास कसा वेडा झाला आहे. यावर जनतेतून उत्तर आले हो विकास वेडा झाला आहे. जनतेच्या या उत्तरावर बोलताना राहुल यांनी खोटं बोलून बोलून विकास वेडा झालायं असे म्हटले. 

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले, की गुजरातमधील सरकार दिल्लीतून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून चालत आहे. राज्य सरकार राज्यातून चालले पाहिजे, दिल्लीतून नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चीनमध्ये बनविण्यात येत आहे. त्यापुतळ्यामागे मेड इन चायना असे लिहिले असेल. देशाला योग्य मार्गावर आणायचे असून, याची सुरवात गुजरातमधून करूया. भाजपचे गुजरात मॉडेल पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com