राहुल हे ‘विदूषक युवराज’

arun-jaitley
arun-jaitley

नवी दिल्ली - ‘राफेल’ विमान खरेदी सौदा व बॅंकांची बुडीत कर्जे (एनपीए) यावरून सरकारवर आक्रमक प्रहार करणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांना दिवसेंदिवस वाढत चाललेला पाठिंबा पाहून चवताळलेल्या भाजपने राहुल यांची संभावना करताना ‘विदूषक युवराज’ अशा शेलक्‍या विशेषांचा वापर केला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर संपूर्ण लेख लिहून त्यांच्या आरोपांमुळे सरकारमध्ये निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेचा पुरावा दिल्याचे मानले जाते.

राहुल हे ‘क्‍लाऊन प्रिन्स’ असल्याचे शीर्षकातच सांगून जेटलींनी म्हटले आहे, की राहुल अशा रणनीतीवर काम करीत आहेत ज्यात एक खोटे निर्माण केले जाते व त्याचा वारंवार उच्चार करून तेच खोटे जनतेच्या मनावर ठसविण्याचा आटापिटा केला जातो. या फेसबुक लेखात अर्थमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली आहेत. ते म्हणतात, की राहुल दोन प्रकारचे खोटे बोलत आहेत. १) राफेल सौदा व २) मोदी सरकारने १५ उद्योगपतींना अडीच लाख कोटींच्या कर्जमाफीची खिरापत वाटल्याबद्दल. या दोन्ही आरोपांतील राहुल यांचा शब्दन्‌शब्द संपूर्ण असत्य आहे. ज्या उद्योगपतींच्या कर्जमाफीबाबत राहुल हे मोदी सरकारला दोष देत आहेत ती कर्जमाफी वा बुडीत कर्जे (एनपीए) यूपीएच्या काळातील म्हणजे २०१४ पर्यंतची आहेत. कारण बॅंकांची माहिती हेच सांगते, की यूपीए काळात बॅंकांची बुडीत कर्जे २.५ लाख कोटी रुपये झालेली होती. यूपीएच्या दोन्ही सरकारांच्या काळीतील एनपीएचे एकूण प्रमाण ८.९६ लाख कोटी होते, हे बॅंकांनी मान्य केलेले सत्य आहे व ते आमच्या सरकारच्या काळात मान्य केलेले नाही.

बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी यूपीए सरकारने काहीही प्रभावी उपाय केले नाहीत. ‘राफेल’ करार हा पूर्णतः पारदर्शकरीत्या झालेला आहे. हा प्रत्यक्ष करार भारतातच झालेला आहे. परदेशात झाला तो केवळ कराराच्या संमतीचा प्रसंग होता. मात्र, सतत व टोकाचा खोटारडेपणा करणारांना, हे कसे समजणार?

हे ‘लाफ्टर चॅलेंज’ नाही
राहुल यांच्या भाषण शैलीवर संघपरिवार कायम खिल्ली उडविताना दिसतो. तोच धागा पकडून जेटलींनी म्हटले आहे, की सार्वजनिक भाषणे ही गंभीर बाब आहे. ते ‘लाफ्टर चॅलेंज’ नाही. सार्वजनिक संभाषणांची उंची मिठ्या मारून, डोळा मारून किंवा खोटारडेपणा करून कमी करू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com