संघाकडून देश तोडण्याचे काम - राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

गुवाहाटी - माझा विरोध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या संघटनांच्या विचारसरणीला आहे. संघाचे लोक देश तोडण्याचा काम करत आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

गुवाहाटीतील बारपेटा न्यायालयात आज (गुरुवार) राहुल गांधी हजर झाले. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना संघाला पुन्हा एकदा लक्ष्य केले. राहुल यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानहानी केल्याचा आरोप आहे. संघाचे स्वयंसेवक अंजन बोरा यांनी गेल्यावर्षी मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांनी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. उत्तर प्रदेशातील किसान यात्रा सोडून राहुल गांधी सुनावणीला हजर झाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, मी गरिब नागरिक, शेतकऱ्यांचे हक्क आणि युवकांच्या रोजगारासाठी लढत असल्याने असे गुन्हे माझ्याविरोधात दाखल करण्यात येत आहेत. मला कोणी रोखू शकत नाही. देशाच्या एकतेसाठी मी कायम लढत राहणार आहे. भाजपने उत्तर प्रदेशात माझ्या किसान यात्रेत अडचणी आणण्याचे प्रयत्न केले. पण, यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.