राहूल गांधी प्रंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी हे 'संयुक्त आघाडी'तर्फे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे आम्हाला मान्य नाही. आंध्र प्रदेशातील मंत्री कलवा श्रीनिवासुलू यांनी ही भूमिका मांडली. श्रीनिवासुलू म्हणाले, "टीडीपी आणि कॉंग्रेस हे दोन पक्ष एकमेकांचा हात धरून चालतील हे समिकरण कधीही जुळू शकत नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणूकीत भाजप किंवा कॉंग्रेस पक्षाचा पंतप्रधान नसेल हे शंभर टक्के स्पष्ट करतो.

विजयवाडा : भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याची चर्चा देशभर सुरू असताना तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) वेगळीच भूमिका घेतली आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी हे 'संयुक्त आघाडी'तर्फे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे आम्हाला मान्य नाही. आंध्र प्रदेशातील मंत्री कलवा श्रीनिवासुलू यांनी ही भूमिका मांडली. श्रीनिवासुलू म्हणाले, "टीडीपी आणि कॉंग्रेस हे दोन पक्ष एकमेकांचा हात धरून चालतील हे समिकरण कधीही जुळू शकत नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणूकीत भाजप किंवा कॉंग्रेस पक्षाचा पंतप्रधान नसेल हे शंभर टक्के स्पष्ट करतो. जर काही पर्यायच शिल्लक राहिला नाही तर कॉंग्रेसला सहकार्य करू."

तीन दिवसांपुर्वी महानाडू येथे झालेल्या पक्षाच्या तीन दिवसीय बैठकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू म्हणाले होते, "2019 ला होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत प्रादेशीक पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे देशाचा पुढील पंतप्रधान कोण असेल हे टीपीडी ठरवणार आहे."

कॉंग्रेस पक्षाने अविचारीपणे तेलगू राज्याचे विभाजन करून आंध्र प्रदेशावर अन्याय केला. आताचे भाजप सरकारही तेच करत आहे. मागील चार वर्षापासून आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. विशेषतःहा हैद्रबाद शहराला आंध्र पासून दुर करून तेलंगनाला दिल्यानंतर या मागणीचा जोर वाढला आहे. भाजप सरकारचीही चार वर्ष वाट पाहिली. मात्र, या सरकारनेही ही मागणी फेटाळल्याच्या कारणावरून मार्च महिन्या टीडीपीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पासून फारकत घेतली आहे. असल्याचेही श्रीनिवासुलू म्हणाले.

Web Title: rahul gandhi not prime ministerial candidate of united front