राहुल गांधी 'पार्ट टाइम' राजकारणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली : राहुल गांधी हे 'पार्ट टाइम' राजकारणी आहेत. त्यांना देशासमोरच्या प्रश्‍नांची नीट जाणीव नाही, अशा शब्दांत भाजपने कॉंग्रेसच्या उपाध्यक्षांवर आज प्रतिहल्ला चढविला.

राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणानंतर भाजप नेते शहानवाज हुसेन यांनी गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना, राहुल गांधी हे परदेशातून सुटीवरून परतल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, भारतातील गरिबांची एवढीच कणव होती तर गांधी परदेशात कशाला गेले होते? तिकडे ते कोठे गेले आहेत याची त्यांच्याच पक्षनेत्यांनाही माहिती नव्हती. अशा नेत्याने भाजपला पारदर्शकतेबद्दल सांगणे विनोदी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदीवरून राहुल गांधी जे आरोप करत आहेत ते बिनबुडाचे आहेत. अशा आरोपांचा धुराळा वारंवार उडविल्याने नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत जी साफसफाई झाली त्यावरून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करत आहे. काळा पैसा, भ्रष्टाचार व देशविघातक शक्तींविरुद्ध सरकारने जे धर्मयुद्ध सुरू केले त्याचा कॉंग्रेसला एवढा त्रास का होत आहे हे सामान्य जनतेला समजत नाही. राहुल गांधी हे कॉंग्रेसमुक्त भारत करण्याच्या प्रक्रियेला बळ देत आहेत असाही टोला त्यांनी लगावला.