"मोदींना पुन्हा माफिवीर व्हावं लागेल"; 'अग्निपथ'वरुन राहुल गांधी भडकले!

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांना शेतकरी कायद्यांची आठवण करुन दिली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sakal

देशभरात सध्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरुन वातावरण तापलेलं आहे. यावरुन विविध राज्यांमध्ये चांगलीच दंगल उसळली आहे. दरम्यान, अनेक नेत्यांनीही केंद्राच्या या योजनेवर टीकाही केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या योजनेवर टीका केली आहे. (Rahul Gandhi criticizes modi government on Agnipath Recruitment Scheme)

Rahul Gandhi
काही लोक 'अग्निपथ'च्या विरोधात गैरसमज पसरवत आहेत : राजनाथ सिंह

केंद्राला तीन कृषी कायद्यांसारखंच ही योजनाही मागे घ्यावी लागेल, असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच शेतकऱ्यांची माफी मागितली, तसंच आता तरुणांचीही माफी मागावी लागेल, असंही राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) म्हणाले आहे. राहुल गांधी यांनी याबद्दलचं ट्वीट केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात, "सलग आठ वर्षांपासून भाजपाचं सरकार 'जय जवान, जय किसान'च्या योजनेच्या मूल्यांचा अपमान करत आहे. मी आधीही सांगितलं होतं की पंतप्रधानांना कृषी कायदे (Farm laws) मागे घ्यावे लागतील. त्याच पद्धतीने त्यांना आता तरुणांचं ऐकून पुन्हा माफिवीर बनावं लागेल आणि अग्निपथ मागे घ्यावं लागेल".

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा (Congress leader Priyanka Gandhi Vadra) यांनीही अग्निपथ योजनेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. बेरोजगार युवकांचं दुःख आणि वेदना सरकार समजून घेत नाही. त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून आशाही हिरावून घेतल्या जातायत, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. त्यांनी काही तरुणांशी संवादही साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com