राहुल गांधींना बॉलिवूडमध्ये जायचंय : किरण खेर

File photo of Kirron Kher
File photo of Kirron Kher

नवी दिल्ली :'राहुल गांधी सभागृहात नाटकं करत होते.. आता बहुतेक त्यांचे पुढचे लक्ष्य बॉलिवूड असेल', असा टोला अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार किरण खेर यांनी लगावला. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर खेर यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

'राफेल' करारावरून राहुल गांधी यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर देशाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर खेर म्हणाल्या, "कुठल्याही पुराव्याशिवाय मंत्र्यांवर खोटे आरोप करताना राहुल गांधी यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी आज संसदेत नाटकेच केली. पंतप्रधान मोदी यांची गळाभेट हा त्याचाच भाग होता. बहुतेक राहुल यांचे पुढील लक्ष्य बॉलिवूड असेल. आता त्यांना तिथेच पाठवायला हवे.'' 

राहुल गांधी यांनी डोळा मारल्याचा व्हिडिओही व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊसच पडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com