भाजपच्या ट्रोल आर्मीने जास्त काम करू नये: राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

परदेशी रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, सोनियाजींच्या वैद्यकीय तपासणीसाठी मी काही दिवस परदेशात जात आहे. काही दिवसांसाठी मी देशाबाहेर असणार आहे. तर, माझे भाजपच्या ट्रोल आर्मीला सांगणे आहे, की त्यांनी जास्त काम करू नये. मी लवकरच परत येणार आहे.

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी या वैद्यकीय तपासणीसाठी रविवारी रात्रीपरदेशी रवाना झाल्याचे काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील त्यांच्याबरोबर गेले आहेत. 

सोनिया यांच्यावर 2011 मध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर दरवर्षी त्या तपासणीसाठी जातात. सोनिया या दीर्घकाळ परदेशी राहणार असून, राहुल मात्र आठवडाभरात परत येणार असल्याचे काँग्रेसने सांगितले. या दोघांच्या परदेशी जाण्यामुळे कर्नाटकमधील खातेवाटप लांबणीवर टाकण्यात आले आहे. 

परदेशी रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, सोनियाजींच्या वैद्यकीय तपासणीसाठी मी काही दिवस परदेशात जात आहे. काही दिवसांसाठी मी देशाबाहेर असणार आहे. तर, माझे भाजपच्या ट्रोल आर्मीला सांगणे आहे, की त्यांनी जास्त काम करू नये. मी लवकरच परत येणार आहे.

Web Title: Rahul Gandhi will accompany Sonia Gandhi her medical check up in abroad