राहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे- नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- शेतकऱयाच्या कर्जमाफीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (शुक्रवार) भेट घेतली. यावेळी राहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

राहुल गांधी व यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत निवेदन दिले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. शेतकऱयांच्या पिकांना योग्य दर देण्यात यावा. शिवाय, नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा झालेली रक्कम कर्जमाफीसाठी वापरण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाले, 'आम्ही शेतकऱयांचे कर्ज माफ करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. पंतप्रधानांनीही शेतकऱयांची स्थिती गंभीर असल्याचे मान्य केले आहे. परंतु, कर्जमाफीसंदर्भात ते काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त ऐकून घेतले आहे.'

दरम्यान, नरेंद्र मोदींविरोधात आपल्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट गांधी यांनी नुकताच केला होता. परंतु, आजच्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपुर्ण वातावरण होते. यावेळी राहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

देश

जो कुरआन में नहीं है, उसे कानून कैसे कहा जा सकता है...सर्वोच्च न्यालयाचे न्यायाधीश कुरियन यांनी निकाल देताना हे मत व्यक्‍त केले....

01.33 AM

मुझफ्फरपूर: पत्रकार राजदेव रंजन यांची हत्या व गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: गुजरातमधील दहशतवाद प्रतिबंध पथकाने (एटीएस) बनावट पासपोर्ट रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गुजरात व मुंबईमध्ये हे बनावट...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017