कर्नाटकमधील छाप्यांचा राजकारणाशी संबंध नाही: प्राप्तिकर विभागाचा दावा

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कॉंग्रेस आमदारांचा या छाप्यांशी काहीही संबंध नाही. प्राप्तिकर विभागाचे शोध पथक व या आमदारांचा काहीही संपर्क झालेला नाही. प्राप्तिकर विभागाची ही कारवाई कर्नाटकमधील केवळ एका मंत्र्यावर करण्यात आलेली आहे

बंगळूर - कर्नाटकमधील उर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्या मालमत्तांवर घालण्यात आलेल्या छाप्यांचा कॉंग्रेस आमदारांशी काहीही संबंध नसल्याचा दावा प्राप्तिकर विभागाकडून करण्यात आला आहे.

""कॉंग्रेस आमदारांचा या छाप्यांशी काहीही संबंध नाही. प्राप्तिकर विभागाचे शोध पथक व या आमदारांचा काहीही संपर्क झालेला नाही. प्राप्तिकर विभागाची ही कारवाई कर्नाटकमधील केवळ एका मंत्र्यावर करण्यात आलेली आहे,'' असे विभागाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) या आमदारांना फोडण्यात येऊ नये, या उद्दिष्टासाठी या आमदारांना रिसॉर्टमध्ये "ठेवण्यात' आले आहे. कर्नाटकमधील उर्जा मंत्री डी के शिवकुमार हे या आमदारांची "काळजी' घेत आहेत. गुजरातमधून कॉंग्रेस ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी या आमदारांचा पाठिंबा कळीचा आहे. मात्र भाजपकडून त्यांना फोडले जाण्याची भीती असल्याने कॉंग्रेसकडून या प्रकरणी अत्यंत काळजी घेण्यात येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर घालण्यात आलेली ही धाड अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

 

Web Title: Raid on Karnataka minister pre-planned, nothing to do with Gujarat Congress MLAs: I-T dept