रेल्वेत 'लोअर बर्थ'साठी मोजावे लागणार जादा पैसे

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

रेल्वे प्रवाशांची नेहमीच लोअर बर्थला जास्त मागणी असते. यामुळे अनेकदा जेष्ठ नागरिक किंवा गरोदर महिलांसारख्या गरजू प्रवाशांना लोअर बर्थ मिळायला त्रास होतो. परंतु, अतिरिक्त शुल्क आकारल्यास मागणी काहीशी कमी होईल आणि गरजूंना लोअर बर्थ उपलब्ध होईल असे रेल्वे विभागाला वाटते.

नवी दिल्ली - लांब पल्ल्याचा सुखकर रेल्वे प्रवास आता काहीसा खर्चिक होण्याची शक्यता आहे. रेल्वेगाडीत 'लोअर बर्थ'ची मागणी करणाऱ्या प्रवाशांना पन्नास ते शंभर रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

रेल्वे प्रवाशांची नेहमीच लोअर बर्थला जास्त मागणी असते. यामुळे अनेकदा जेष्ठ नागरिक किंवा गरोदर महिलांसारख्या गरजू प्रवाशांना लोअर बर्थ मिळायला त्रास होतो. परंतु, अतिरिक्त शुल्क आकारल्यास मागणी काहीशी कमी होईल आणि गरजूंना लोअर बर्थ उपलब्ध होईल असे रेल्वे विभागाला वाटते. याशिवाय, या शुल्कातून रेल्वे विभागाला अतिरिक्त महसूलदेखील मिळू शकणार आहे. परंतु, तिकीटाच्या तुलनेत अतिरिक्त शुल्क फार कमी असल्याने निर्णयाविषयी शंका उपस्थित केली जात आहे.  

त्याचप्रमाणे, रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देशातील 983 रेल्वेस्थानकांवर 19 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकार निर्भया फंडातून 500 कोटी रुपये देणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच टेंडर काढले जाणार आहे.