दुसरी टर्म न मिळण्याची राजनांना जाणीव-स्वामी

वृत्तसंस्था
रविवार, 19 जून 2016

भुवनेश्वर - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना जाणीव झाली होती की आपल्याला दुसऱ्या टर्म करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतःच दुसरी टर्म करण्यास नकार दिल्याचे, भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

रघुराम राजन यांनी केंद्रीय बॅंकेचे प्रमुख या नात्याने दुसरी टर्म (कार्यकाळ) करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, की 4 सप्टेंबरमध्ये गव्हर्नरपदावरून निवृत्त होत असून, आपण पुन्हा शिक्षणक्षेत्रात परतणार आहोत. राजन यांच्या हकालपट्टीची मागणी स्वामी यांच्याकडून सतत करण्यात येत होती. स्वामी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिले होते.

स्वामी म्हणाले, ‘‘राजन यांना जाणीव झाली होती की त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. राजन यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. त्यांना गव्हर्नर पदावरून हटविण्यासाठी मी जी कारणे दिली होती, ती सर्व बरोबर होती. हे चांगले झाले की त्यांनी स्वतःच आपण दुसरी टर्म करणार नसल्याचे सांगितले.‘‘

Web Title: rajan aware of not getting 2nd term