राजस्थान, गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

जयपूर: मुसळधार पावसामुळे गुजरात व राजस्थानच्या अनेक भागांत नद्यांना पूर आला आहे. पुराचा फटका हजारो नागरिकांना बसला असून, त्यांच्या मदतीसाठी आज लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

राजस्थानातील जामनगर, जोधपूर व फालोदी या जिल्ह्यांत लष्कर तसेच हवाई दलाने मदतकार्य सुरू केले आहे. यासाठी चार एम आय हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान राजस्थानातील खेरवाडा येथे पुराच्या पाण्यात जीप वाहून गेल्याने एक महिला व तिच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

उत्तर गुजरातच्या बनासकांठा व पाटन जिल्ह्यांत अनेक नद्यांना पूर आला आहे. राज्य सरकारने येथे अतिदक्षतेचा इशारा दिला असून, लष्कराच्या तिन्ही दलांच्या जवानांनी मदतकार्य सुरू केले आहे. या भागातील 2200 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले,"" राजस्थानमध्ये होत असलेल्या पावसामुळे राज्यात अनेक नद्यांना पूर आला असून, धरणांतील पाणीसाठा वाढला आहे.