रजनीकांतही संभ्रमात! कोणालाही पाठिंबा नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

मी म्हणजे परिस्थितीमुळे निर्माण झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे परिस्थिती निर्माण झालीच तर मी राजकारणात उतरू शकतो. मला राजकारणाची खोली माहीत आहे. अनेकांच्या खांद्यांवर पाय देऊन मला जावे लागेल. त्यामुळेच त्याबद्दल साशंक आहे, असे रजनीकांत म्हटले होते. 

चेन्नई : तमिळनाडूतील आर.के. नगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपला कोणालाच पाठिंबा नसल्याचे अभिनेते रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. अभिनेते असले तरी रजनीकांत यांचे मत जाणून घेण्यास त्यांचे चाहते, राजकीय कार्यकर्ते उत्सुक असतात. यावेळी मात्र रजनीकांत स्वतःच 'कन्फ्युज'
 
"आगामी निवडणुकांमध्ये माझा कोणालाही पाठिंबा नाही," असे 66 वर्षीय रजनीकांत यांनी ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते असणाऱ्या रजनीकांत यांचा दक्षिणेतील जनमानसावर मोठा प्रभाव आहे. त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष अनेक वर्षांपासून करीत आहेत. 

राजकीय घडामोडींवर रजनीकांत हे अनेकदा प्रतिक्रिया व्यक्त करीत असतात. मात्र, या निवडणुकीबद्दल रजनीकांत स्वतःच संभ्रमात असल्याचे चित्र आहे. 
यापूर्वी, 2014 मध्ये आपण राजकारणात उतरण्यास घाबरत नाही, परंतु अशा निर्णयाचे परिणाम काय होतील याबाबत मी साशंक आहे. मी म्हणजे परिस्थितीमुळे निर्माण झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे परिस्थिती निर्माण झालीच तर मी राजकारणात उतरू शकतो. मला राजकारणाची खोली माहीत आहे. अनेकांच्या खांद्यांवर पाय देऊन मला जावे लागेल. त्यामुळेच त्याबद्दल साशंक आहे, असे रजनीकांत म्हटले होते.