'रघुराम राजन यांच्यामुळेच विकासदराची घसरण'

Rajiv Kumar says Growth was declining due to former RBI Governor Raghuram Rajans policies
Rajiv Kumar says Growth was declining due to former RBI Governor Raghuram Rajans policies

नवी दिल्ली- विकासदराची घसरण ही नोटाबंदीमुळे झाली नव्हती, तर विकासदराच्या घसरणीसाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हेच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. थकीत कर्जाच्या (एनपीए) समस्येमुळे विकासदराची घसरण झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे, यासाठी त्यांनी त्यावेळेसचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या धोरणास जबाबदार ठरवले आहे.

सध्या विकासदर घसरणीस अनेकजण नोटाबंदीस कारणीभूत ठरवत आहेत. नोटाबंदीमुळे विकासदर घसरला असल्याचा आरोप केंद्र सरकारवर होत आहे. त्या आरोपांबाबत बोलतांना राजीवकुमार म्हणाले की, हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंगसारख्या लोकांनीही असेच म्हटले आहे की, नोटाबंदीमुळे विकासदर घसरला आहे. जर तुम्ही विकासदराचे आकडे पाहिले तर हे नोटाबंदीमुळे झालेले नाहीत, तर मागील सहा तिमाहींपासून सातत्याने हा दर खाली जात होता. याची सुरूवात 2015-2016 च्या दुसऱ्या तिमाहीत झाली होती. तेव्हा विकासदर 9.2 टक्के होता. त्यानंतरच्या प्रत्येक तिमाहीत हा विकासदर घसरत गेला. हा नोटाबंदीचा फटका नव्हता. नोटाबंदी आणि विकासदराच्या घसरणीत एकमेकांचा प्रत्यक्षात कोणताच संबंध नाही, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे. 

विकासदराच्या घसरणीस थकीत कर्जाची (एनपीए) समस्येला जबाबदार ठरवत ते म्हणाले की, बँकिंग क्षेत्रातील थकीत कर्जाची समस्या वाढल्यामुळे विकासदरात घसरण झाली. दरम्यान, संसदीय मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी केंद्रीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना नुकतेच मूल्यांकन समितीच्या बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते. संसदीय समिती देशात उद्भवलेल्या थकीत कर्जाच्या (एनपीए) संकटाला तोंड देण्यासाठी चौकशी करत आहे. त्यासाठी समितीला राजन यांच्या सल्ल्याची आवश्यकता वाटत असल्याचे जोशी यांनी म्हटले होते. तसेच, या थकीत कर्जाच्या (एनपीए) समस्येतून मार्ग काढण्यासाठी मदत करावी, अशी आशाही संसदीय मूल्यांकन समितीने रघुराम राजन यांच्याकडे पत्राद्वारे व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com