राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- विरोधी खासदारांनी सातत्याने कामकाज बंद पाडल्याने राज्यसेभेचे 241 वे सत्रामधील कामकाज अजिबात पार पडू शकले नाही. यानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. 

सभागृहातील सर्वच घटकांनी सतत कामकाज बंद पाडल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहातील सर्व खासदारांनी आत्मपरीक्षण करावे असे त्यांनी सांगितले. 

अन्सारी यांनी अनिश्चित काळासाठी कामकाज तहकूब केले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते. 
राज्यसभेचे हे 241वे सत्र 16 नोव्हेंबर रोजी सुरू झाले होते. मात्र, प्रामुख्याने नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधी सदस्यांनी सातत्याने कामकाज बंद पाडल्याने हे सत्र निष्फळ ठरले. सत्ताधारी सदस्यांनी अनेकवेळा त्यांना आक्रमकपणे सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही प्रत्युत्तर म्हणून घोषणाबाजी केली, मात्र अपेक्षित कामकाज होऊ शकले नाही. 
 
Web Title: Rajya Sabha adjourned sine die; Hamid Ansari ask members to introspect