'रामायण संग्रहालय हे माझ्यासाठी लॉलीपॉप'

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

अयोध्येत राम मंदिर सुद्धा उभारण्याचा प्रयत्न करू, फक्त लॉलीपॉपवर समाधानी राहणार नाही.

- भारतीय जनता पक्षाचे खासदार विनय कटियार

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात रामायण संग्रहालय लवकरच उभे केले जाईल. संबंधित संग्राहलय हे माझ्यासाठी 'लॉलीपॉप' आहे, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार विनय कटियार यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.

कटियार म्हणाले, 'अयोध्येत राम मंदिर सुद्धा उभारण्याचा प्रयत्न करू, फक्त लॉलीपॉपवर समाधानी राहणार नाही. अयोध्येत जेंव्हा-जेंव्हा जात असे त्यावेळी तेथील संत राम मंदिर केंव्हा उभारणार म्हणून विचारणा करत असायचे. त्यामुळे मी आज तेथे जात नाही. परंतु, केंद्रीय पर्यटणमंत्री महेश शर्मा यांच्यासोबत नियोजन करून लवकरच तेथे जाणार आहे. शिवाय, अयोध्येपासून 15 कि.मी. अंतरावर उभारण्यात येणाऱया रामायण संग्रहालयला सुद्धा भेट देणार आहे.'