नवी दिल्ली : ''पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचा सर्वसामान्यांच्या जीवनमानावर परिमाण होत आहे. त्यामुळे पेट्रोल अाणि डिझेलच्या किमती कमी झाल्याच पाहिजेत, असे माझे मत आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता'', असे स्पष्टीकरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. तसेच आठवलेंनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत जनतेची माफीही मागितली.
जयपूर येथे पत्रकारांनी आठवलेंना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर आठवले म्हणाले होते, की ''मी मंत्री आहे, मला सरकारी गाडी मिळते. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझे मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल''.
त्यानंतर आता आठवलेंनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, ''माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास केला आहे. त्यामुळे मला याची जाणीव असून, मी सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी करणार आहे''.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.