'बास, आता भाजपचा प्रचार करणार नाही'

ramdevbaba
ramdevbaba

नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी सरकारवर टीका होत असतानाच, योगगुरू रामदेवबाबा यांनी 'मला परवानगी दिली तर मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची विक्री करेन' असे वक्तव्य केले आहे. तसेच भाजपचा प्रचार करणार का असा सवाल केल्यावर त्यांनी 'आता भाजपचा प्रचार करणार नाही,' असे उत्तर दिले. 

'मला पेट्रोल पंप चालवण्याची परवानगी व करात थोड्याफार प्रमाणात सवलत मिळाली तर 35-40 रुपये प्रति लिटरने पेट्रोल-डिझेल विकेन. सध्या महागाई वाढली आहे, ही महागाई कमी न झाल्यास भाजप सरकारला त्याचा चांगलाच तोटा होईल.' असे विधान रामदेवबाबांनी एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना केले. 2019 च्या निवडणूकीपूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा असा सल्लाही मी मोदी सरकारला दिला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

रामदेवबाबांनी दोन दिवसांपूर्वीच महागाईवरून व रूपयाने निच्चांक गाठल्याने, मोदी सरकारवर टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com