डिजिटल व्यवहारामुळे पासवान पडले तोंडघशी! 

वृत्तसंस्था
रविवार, 25 डिसेंबर 2016

हाजीपूर : केंद्र सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनाच इंटरनेटच्या संथ गतीमुळे डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ लागत असलेला व्यवहार डिजिटल माध्यमातून करण्यासाठी त्यांना अर्धा तास खोळंबावे लागले. 

केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री असलेल्या पासवान यांच्या हस्ते आज येथे अनेक ठिकाणी डिजिटल व्यवहारांची सुविधा सुरू करण्यात आली. पासवान यांचाच हा लोकसभा मतदारसंघ आहे. येथे चहाच्या टपरीवर पासवान यांनी 'पॉइंट ऑफ सेल मशिन'चे उद्‌घाटन केले. त्यांनतर चहाचे पैसे डिजिटल माध्यमातून चुकते करताना इंटरनेटच्या संथ गतीचा त्यांना फटका बसला. त्यांना डिजिटल माध्यमातून पैसे देण्यासाठी सुमारे अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. यामुळे पासवान तोंडघशी पडल्याचे चित्र होते.

यातून मार्ग काढण्यासाठी आगामी काळात या परिस्थितीत बदल होऊन हा वेग वाढेल आणि डिजिटल व्यवहार वेगाने होतील, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

02.06 PM

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

01.15 PM

रायपूर (छत्तीसगड) : रायपूरमधील दुर्ग जिल्ह्यात सरकारी गोशाळेतील 110 गायींचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उडकीस आली...

12.21 PM