बलात्काऱयाने कारागृहात 'तिच्या'शी केला विवाह

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

कोलकता- बलात्कार करणाऱया गुन्हेगाराने कारागृहात तिच्याशी विवाह केल्याची घटना पश्चिम बंगालमधील पुरुलिया कारागृहात घडली आहे.

मनोज बौरी (वय 30) याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली सन 2010 मध्ये अटक झाली होती. बलात्काराच्या घटनेनंतर पीडीत महिलेने एका मुलाला जन्म दिला होता. या घटनेनंतर बौरी याने पीडीत महिलेसह मुलाचा स्वीकार करण्यास तयार असल्याचे न्यायालयात सांगितले होते. न्यायालयाने बौरीची मागणी मान्य करत दोघांना कारागृहात विवाह करण्याची परवानगी दिली. पुरुलिया कारागृहामध्ये दोघांचा नुकताच विवाह पार पडला. शिवाय, चिमुकल्याचाही स्विकार केला.

पीडीत महिलेने सांगितले की, 'बलात्काराच्या घटनेनंतर एका मुलाला जन्म दिला होता. त्याचे पालन-पोषण करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शाळेमध्ये प्रवेश घेतानाही वडिलांच्या नावाची अडचण आली होती. आमचा विवाह झाल्यामुळे दोघेही खुष असून, सर्वकाही सुरळीत होणार आहे. शिवाय, मुलाला दोघांचेही प्रेम मिळेल.'