नोटबंदीचे परिणाम दिसत आहेत- रविशंकर प्रसाद

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नोटाबंदीच्या या निर्णयाचे परिणाम दिसू लागले आहेत. बनावट नोटा चलनातून हद्दपार होत आहेत. बँकांमध्ये आतापर्यंत 4 लाख कोटी रुपये जमा झाले असून, यामध्ये एकही काळा पैसा नाही.

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्याने त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. बँकांमध्ये तब्बल 4 लाख कोटी रुपये जमा झाल्याचे, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर देशभरातील नागरिक या नोटा बदलून घेण्यासाठी व खात्यावर जमा करण्यासाठी बँकांबाहेर गर्दी करत आहेत. या निर्णयामुळे बनावट नोटांवर बंदी आल्याचे बोलले जात आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले, की नोटाबंदीच्या या निर्णयाचे परिणाम दिसू लागले आहेत. बनावट नोटा चलनातून हद्दपार होत आहेत. बँकांमध्ये आतापर्यंत 4 लाख कोटी रुपये जमा झाले असून, यामध्ये एकही काळा पैसा नाही. भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत असून, सुरक्षेच्या बाबतीतही आपण मजबूत होत आहोत.

Web Title: ravishanker prasad on currency ban