घाबरून जाऊ नका: आरबीआयचे नागरिकांना आवाहन

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

बरेचसे नागरिक बँकांच्या वेगवेगळ्या शाखेत आणि एटीएममध्ये जाऊन रोख रक्कमेचा साठा करत आहे. मात्र नागरिकांना पैश्याचा साठा करून न ठेवण्याचे आवाहन आरबीआयने त्यांच्या संकेतस्थळावरुन केले आहे

नवी दिल्ली: पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये लांबचलांब रंगा लावल्या आहेत. शिवाय प्रत्येक बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली आहे. अशावेळी नागरिकांनी संयम ठेवण्याचे आवाहन रिझर्व्ह बॅंकेकडून करण्यात आले आहे.

बरेचसे नागरिक बँकांच्या वेगवेगळ्या शाखेत आणि एटीएममध्ये जाऊन रोख रक्कमेचा साठा करत आहे. मात्र नागरिकांना पैश्याचा साठा करून न ठेवण्याचे आवाहन आरबीआयने त्यांच्या संकेतस्थळावरुन केले आहे.

बाजारात रु.10, 20, 50 आणि 100 च्या नोटा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यामुळे पैशाचा साठा करून ठेवण्याएवजी हवे त्यावेळी लोकांनी बॅंकेतून पैसे काढावेत असेही आरबीआयने म्हटले आहे.

Web Title: RBI appeals not to panic