"यूपी'त लाल दिव्यांसह सुरक्षेतही कपात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांवरील लाल आणि निळे दिवे तातडीने काढण्याचा आदेश दिला असून, त्याच्या सुरक्षेतही कपात केली आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांवरील लाल आणि निळे दिवे तातडीने काढण्याचा आदेश दिला असून, त्याच्या सुरक्षेतही कपात केली आहे.

सरकारच्या विविध विभागांचे सादरीकरण शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांवर लाल व निळ्या दिव्यांचा वापर आजपासूनच थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सरकारी प्रवक्‍त्याने सांगितले. मात्र, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, लष्कर व पोलिसांच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्येही कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे प्रवक्‍त्याने सांगितले.