पंजाबमध्ये 48 केंद्रांवर पुन्हा मतदान

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

आपले मत अचकूपणे दिले गेले की नाही याची पडताळणी मतदारांना करता यावी यासाठी मतदारयंत्रांमध्ये VVPAT ही स्वतंत्र यंत्रणा आहे.

चंडीगड- निवडणूक आयोगाने मंगळवारी पंजाबमधील मजिठा, मुक्तसर आणि सांगरूर विधानसभा मतदारासंघांतील एकूण 48 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. नव्याने घेण्यात येणारे मतदान 9 फेब्रुवारी रोजी होईल. 

यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात त्रुटी आढळून आल्यामुळे पुन्हा मतदान घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पंजाबचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.के. सिंग यांनी दिली. याशिवाय मोगा आणि शार्दुलगड या भागांमध्ये चाचणीदरम्यान मतदान एकतर्फी होत असल्याचे आढळून आल्याने तिथेही पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. 

आपले मत अचकूपणे दिले गेले की नाही याची पडताळणी मतदारांना करता यावी यासाठी मतदारयंत्रांमध्ये VVPAT ही स्वतंत्र यंत्रणा आहे. निवडणुकीतील गैरप्रकार शोधण्यासाठी, तसेच इलेक्ट्रॉनिक स्वरुपात नोंदविण्यात आलेल्या निकालांचा लेखाजोखा ठेवण्यासाठी ही यंत्रणा आहे.