राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरुणीवर सामूहिक बलात्कार

file photo
file photo

गुरगाव (हरियाणा): राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या 19 वर्षीय तरुणीचे अपहरण केल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन 12 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणी रेल्वेच्या परीक्षेची तयार करत असून, ती क्लासला जात होती, तिच्या गावामधील पंकज, मनीष आणि निशू यांनी तिचे अपहरण केले. अपहरणानंतर तिघांनी तिला महेंद्रगढ आणि झज्जर जिल्ह्याच्या सीमेवरील शेतातमध्ये असलेल्या एका विहिरीजवळ घेऊन गेले. तिथे आणखी काहीजण हजर होते. दारुच्या नशेत असलेल्या तब्बल 12 जणांनी सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कारानंतर दुपारी चारच्या सुमारास पीडित तरुणीला बेशुद्ध अवस्थेत सोडून पळून गेले. यानंतर आरोपींपैकी एकाने पीडित तरुणीच्या घरी फोन करुन, तुमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यानंतर कुटुंबियांना धक्काच बसला. दुर्दैव म्हणजे पोलिसांनी हद्दीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

पीडित कुटुंबाने तक्रार रेवाडी पोलिस ठाण्यात दिली. मात्र, कुटुंबाला हद्दीचे कारण दिले. त्यांना महेंद्रगढमधील कनीना ठाण्यात खटला दाखल करण्यास सांगितले. कुटुंब तिकडे गेल्यावर कनीना पोलिसांनीही ती हद्द आमची नसल्याचे सांगत, परतवून लावले, यामुळे कुटुंबियांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या घटनेनंतर धक्का बसलेल्या पीडित मुलीच्या आईने पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

"माझ्या मुलीने सीबीएसई बोर्ड परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या बेटीचे कौतुक केले होते. 26 जानेवारी 2016 रोजी तिला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले होते. मोदी म्हणतात 'बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ', मग आता काय करायचं?  आता माझ्या मुलीला न्याय कोण देईल? अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली.

दरम्यान, पीडित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com