होळीला स्त्री, पुरुष एकमेकांना स्पर्श करतात-राम

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

होळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात.

मुंबई - महिला दिनी आक्षेपार्ह ट्विट करणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्माने पुन्हा एकदा होळीनिमित्त वादग्रस्त ट्विट केले असून, त्याने होळी हा एकमेव असा दिवस आहे की स्त्री व पुरुष एकमेकांना स्पर्श करू शकतात असे म्हटले आहे.

राम गोपाल वर्मा म्हणाला, ''होळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात. मला माहित नाही, कोणत्या देवाने कोणत्या राक्षसाचा वध केला, पण असे मादक क्षण निर्माण केल्याबद्दल मी राक्षसांचे आभार मानतो. 120 कोटी जनतेपैकी एकाला तरी होळी साजरा करण्याचे कारण माहित आहे का, मला शंका वाटते. पण सगळे भांग पितात, मेरा भारत महान.''

राम गोपाल वर्माने महिला दिनी ट्विट करताना महिलांनी सनी लिऑनप्रमाणे पुरुषांना आनंद दिला पाहिजे, असे आक्षेपार्ह ट्विट केले होते. या ट्विटनंतर त्याच्याविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर, गोव्यात सामाजिक कार्यकर्त्याकडून त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. आता राम गोपाल वर्माने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे.