अडवाणींना अटक करणाऱ्याला भाजपकडून मंत्रिपद

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

अडवाणींना अटक करणारे तत्कालिन आयएएस अधिकारी भाजपच्याच मंत्रिमंडळात मंत्री बनले आहेत. हा ही योगायोग आहे. बिहारमधील सिंह हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. सिंह 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सहभागी झाले होते. 

नवी दिल्ली : सुमारे 26 वर्षापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बिहारमध्ये अटक करणारे तत्कालिन अधिकारी आर. के. सिंह (आयएएस) यांना आज (रविवार) केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

ऑक्‍टोबर 1990 मध्ये अडवाणी यांनी गुजरात ते उत्तरप्रदेश अशी रथ यात्रा काढली होती. या यात्रेची देशभर चर्चा सुरू होती. धर्मनिरपेक्ष नेत्यांनी या यात्रेला विरोध केला होता. 26 वर्षापूर्वी बिहारमध्ये लालूप्रसाद मुख्यमंत्री होते आणि आर. के. सिंह हे बिहार सरकारचे सचिव होते. त्यावेळी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांनी अडवाणी यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी सिंह यांनी अडवाणींना अटक केल्याने हिंदुत्त्वादी संघटनांनी टीका करीत देशभर निदर्शने आणि आंदोलनेही केली होती. 