दिल्ली-पाटना राजधानी एक्‍सप्रेसवर दरोडा

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

बिहारमधील बक्‍सर जिल्ह्यातून पाटनाच्या दिशेने जात असलेल्या दिल्ली-पाटना राजधानी एक्‍सप्रेसवर आज (रविवार) पहाटे दरोडा पडला. दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण केल्याचेही वृत्त आहे.

बक्‍सर (बिहार) - बिहारमधील बक्‍सर जिल्ह्यातून पाटनाच्या दिशेने जात असलेल्या दिल्ली-पाटना राजधानी एक्‍सप्रेसवर आज (रविवार) पहाटे दरोडा पडला. दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण केल्याचेही वृत्त आहे.

आज (रविवार) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास राजधानी एक्‍सप्रेस बक्‍सर जिल्ह्यातून जात होती. त्यावेळी ए-4, बी-1 आणि बी-2 या डब्यांवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी प्रवाशांकडील मौल्यवान वस्तू आणि पैसे लुटले आणि प्रवाशांना मारहाण केली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. एक्‍सप्रेस पाटना येथे पोचल्यानंतर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त गोंधळ केला. दरम्यान, कर्तव्याच्या ठिकाणी निष्काळजीपणा केल्याने रेल्वे सुरक्षा पथकातील एका निरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.