'आयटी'तील तरुणाने बनवला बॅंकिंगबाबत माहिती देणारा रोबोट

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

कोईंबतूर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंकेतील व्यवहारांवर भर देण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कोईंबतूर येथील एका तरुणाने बॅंकेतील खात्यासंबंधी आणि अन्य माहिती देणारा रोबोट तयार केला आहे.

कोईंबतूर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंकेतील व्यवहारांवर भर देण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कोईंबतूर येथील एका तरुणाने बॅंकेतील खात्यासंबंधी आणि अन्य माहिती देणारा रोबोट तयार केला आहे.

व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या विजयने हा रोबोट तयार करण्याचा निर्णय घेतला. नोटाबंदीनंतर बॅंकेत गर्दी होत असून माहितीअभावी ग्राहकांचा वेळ खर्च होत आहे. ही सर्व परिस्थिती पाहून विजयने रोबोट तयार केला आहे. हा रोबोट बॅंकेतील ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना बॅंकेत खाते कसे उघडायचे, तसेच आधीच उघडण्यात आलेल्या खात्यासंबंधी माहिती देतो. तसेच या रोबोटला एकूण पंधरा भाषा माहिती असल्याचा दावाही विजयने केला आहे. नाताळापर्यंत हा रोबोट प्रत्यक्ष कार्यान्वित होईल, असेही विजयने पुढे सांगितले.

नोटाबंदीनंतर बॅंकेतील कर्मचारी नोटांचे वितरण आणि इतर कामामध्ये व्यग्र आहेत. काही बॅंकांमध्ये तर कर्जप्रक्रियेसह अन्य काही प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत. तसेच गर्दी वाढली असल्याने बॅंकेतील ग्राहकांना माहिती देण्यास कर्मचारी अपुरे पडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विजयने तयार केलेला रोबोट जर यशस्वीरित्या कार्यान्वित झाला तर बॅंकेतील कर्मचाऱ्यांचा ताण हलका होण्यास काहीअंशी मदत मिळणार आहे.

देश

मुझफ्फरनगरजवळ १४ डबे रुळावरून खाली मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील खतौलीजवळ (जि. मुझफ्फरनगर) शनिवारी (ता. १९) पुरी-हरिद्वार...

09.00 AM

भाजप- काँग्रेसमध्ये भडकले वाक्‌युद्ध गोरखपूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोरखपूरला भेट दिली. येथील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

भोपाळ: भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे तर, किमान 50 वर्षांसाठी सत्तेत आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017