रॉकीच्या जामीनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

पाटणा - गया रोड रेजप्रकरणी राकेश रंजन यादव ऊर्फ रॉकी यादव याला पाटणा उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. जनता दल संयुक्तमधून निलंबित केलेल्या मनोरमा देवी आणि इतिहास तज्ज्ञ बिंदी यादव यांचा तो मुलगा आहे. त्याने यंदाच्या मे महिन्यात बारावीचा विद्यार्थी आदित्य सचदेव याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पाटणा उच्च न्यायालयाने रॉकी यादव याला जामीन मंजूर केला होता, त्याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचे ठरविले असल्याचे राज्याचे महाधिवक्ता ललित किशोर यांनी सांगितले.