'निपाह'मुळे दगावलेल्या परिचारिकेच्या कुटुंबियांना मदत

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

''कोझिकोडे आणि मलाप्पुरम जिल्ह्यात कोणताही नवा रुग्ण आढळला नाही. आमचे केंद्रीय पथक या निपाह व्हायरसचा सामना करण्यासाठी रिबिविरीन टॅब्लेट उपलब्ध करून देत आहे''.

- आरोग्यमंत्री के. के. शैलजा

नवी दिल्ली : निपाह व्हायरसने पीडित एका रुग्णावर उपचार करणाऱ्या परिचारिका लिनी पुथुस्सेरीचा काल (मंगळवार) मृत्यू झाला. त्यानंतर आता केरळ सरकारकडून तिच्या कुटुंबियांना 20 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली असून, तिच्या पतीला राज्य सरकारकडून नोकरीही देण्यात येणार आहे.

केरळमधील लिनी पुथुस्सेरी ही तरुण परिचारिका निपाह व्हायरसने पीडित रुग्णावर उपचार करत होती. यादरम्यान निपाहची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला. तिने मृत्यूपूर्वी पती साजिश यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले होते, की माझी जायची वेळ झाली. माझ्या मुलांची काळजी घ्या, असे तिने लिहिले होते. तिच्या मृत्यूनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तिच्या पतीला नोकरीच्या ऑफर दिली आहे. तसेच अन्य मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांच्या नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.  

''कोझिकोडे आणि मलाप्पुरम जिल्ह्यात कोणताही नवा रुग्ण आढळला नाही. आमचे केंद्रीय पथक या निपाह व्हायरसचा सामना करण्यासाठी रिबिविरीन टॅब्लेट उपलब्ध करून देत आहे'', असे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले. 

Web Title: Rs 20 lakh for children job for husband of Kerala nurse who died of Nipah virus