नितीश कुमार करणार होते उद्घाटन, पण वाहून गेले धरण

वृत्तसंस्था
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील कहलगाव येथे 389.31 कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या गंगा पंप कॅनॉल प्रकल्पाचे उद्घाटन नितीश कुमार यांच्या हस्ते होणार होते. पण, उद्घाटन होण्यापूर्वीच धरणाची भिंतच वाहून गेल्याने याचा फटका आजुबाजुच्या परिसराला बसला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी आपला हा कार्यक्रम रद्द केला आहे.

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले धरण फुटले. या धरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाकडून (राजद) करण्यात येत आहे.

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील कहलगाव येथे 389.31 कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या गंगा पंप कॅनॉल प्रकल्पाचे उद्घाटन नितीश कुमार यांच्या हस्ते होणार होते. पण, उद्घाटन होण्यापूर्वीच धरणाची भिंतच वाहून गेल्याने याचा फटका आजुबाजुच्या परिसराला बसला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी आपला हा कार्यक्रम रद्द केला आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या गंगा पंप कॅनॉल प्रकल्प बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राजदने केला आहे. तेजस्वी यादव यांनी ट्विटरवरून म्हटले आहे, की उद्घाटनापूर्वीच हे धरण वाहून गेले. भ्रष्टाचारात आणखी एक धरण वाहून गेले आहे. मुख्यमंत्री मोठा गाजावाजा करून याचे उद्घाटन करणार होते. 

बिहार आणि झारखंडमधील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी पुरवण्यासाठी हे धरण भागलपूर जिल्ह्यात  गंगा नदीवर 389.31 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची महात्वाकांक्षी योजना आहे. आज (बुधवार) या धरणाचे उद्घाटन होते. मंगळवारी पाण्याचा दबाव वाढल्यामुळे धरणाची भिंत वाहून गेली.