मोदी, संघाने तमिळनाडूतील जनतेच्या भावनांशी खेळू नये: राहुल

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक लोक गंभीर जखमी झाले. त्यावर आज (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) निशाणा साधला. ते म्हणाले, ''आरएसएस आणि मोदींच्या गोळ्या तामिळनाडूच्या जनतेच्या भावना चिरडून टाकू शकत नाही. माझ्या बंधू आणि भगिणींनो आम्ही तुमच्यासोबत आहोत'', असे राहुल गांधी यांनी ट्विटवर सांगितले. 

तसेच राहुल गांधी यांनी 'स्टेअरलाईट कॉपर प्लांट'च्या विरोधात पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात अनेक लोक मृत्युमुखी पडले. या घटनेबाबत ते म्हणाले, ही घटना राज्य सरकार पुरस्कृत दहशतवादाचे क्रूर उदाहरण आहे. नागरिकांनी अन्यायाविरोधात आवाज उठविल्याने त्यांची एकप्रकारे हत्याच करण्यात आली. माझे विचार आणि माझी प्रार्थना या गोळीबारात मृत्यू पावलेल्या हुतात्मा आणि जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबियांसोबत आहे. 

येथील जनतेकडून जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत विरोध केला जात होता. यादरम्यान पोलिसांकडून गोळीबारही करण्यात आला होता. या हिंसाचारादरम्यान संतप्त जमावाकडून दगडफेक आणि सरकारी वाहने आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते.

Web Title: RSS and PM Narendra Modi can never crush feelings of the Tamil people says Rahul Gandhi #SterliteProtest