RSSचा झेंडा एक दिवस राष्ट्रध्वज बनेल; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

भारत लवकरच एक हिंदू राष्ट्र बनेल, असंही या भाजपा नेत्याने म्हटलं आहे.
RSS Flag
RSS FlagSakal Media

आरएसएसचा झेंडा एक दिवस राष्ट्रध्वज बनेल, असं विधान कर्नाटकचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते के.एस.इश्वरप्पा यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आधीही इश्वरप्पा यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. (RSS Flag will become national flag one day says BJP Leader)

के. एस. इश्वराप्पा (KS Ishwarappa) म्हणाले की, भगव्या ध्वजाकडे आदराने पाहिलं जातं. हजारो वर्षे भगव्या झेंड्याचा आदर केला गेलाय. भगवा ध्वज त्यागाचं प्रतिक आहे. आरएसएसचा (RSS - Rashtriy Swayamsevak Sangh) झेंडा एक दिवस राष्ट्रीय ध्वज बनेल यात शंका नाही. त्यागाची भावना जपण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगवा झेंडा समोर ठेवून पूजा करतं. संविधानानुसार तिरंगा राष्ट्रध्वज आहे, तिरंग्याला जो मान द्यायला हवा, तो आम्ही देतोय.

अशाच प्रकारचं विधान इश्वरप्पा यांनी याआधीही केलं होतं. ते म्हणाले होते की, भगवा झेंडा भविष्यात राष्ट्रीय ध्वज बनू शकतो. सध्या तिरंगा राष्ट्रीय ध्वज आहे आणि त्याचा सर्वांनीच सन्मा केला पाहिजे. अनेक वर्षांपूर्वी भगवान राम आणि मारुतीच्या रथांवर भगवे झेंडे होते. तेव्हा आपला तिरंगा होता का? पण आता तो आपला राष्ट्रीय ध्वज आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा मान राखला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com