रशियाच्या भारतातील राजदूताचे निधन

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

कदाकिन यांच्या रुपाने भारताने आज भारत व रशियामधील द्विपक्षीय संबंधांना गेली काही दशके आकार देणारा ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी गमावला आहे

नवी दिल्ली - रशियाचे भारतामधील राजदूत ऍलेक्‍झांडर कदाकिन यांचे आज (गुरुवार) सकाळी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी ट्विटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.

""कदाकिन यांच्या रुपाने भारताने आज भारत व रशियामधील द्विपक्षीय संबंधांना गेली काही दशके आकार देणारा ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी गमावला आहे,'' अशा शब्दांत स्वरुप यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कदाकिन हे 2009 पासून रशियाचे भारतामधील राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळत होते.