पाकिस्तानमध्ये होणारी 'सार्क' परिषद रद्द- सूत्र

saarc summit
saarc summit

नवी दिल्ली- पाकिस्तानमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱया 19व्या सार्क परिषदेत भारतासह अफगणिस्तान, भूतान व बांगलादेशने सहभागी होण्यास नकार दिल्याने ही परिषद रद्द झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी आज (बुधवार) दिली.

उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली तीव्र भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये होणाऱ्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या "सार्क' परिषदेवरही बहिष्कार टाकला आहे. "इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत,' असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. "सार्क'मधील इतर सदस्य देशांपैकी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान या देशांनीही या परिषदेवर बहिष्कार घातला असून, परिषद रद्द झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, उरीत लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्याचे धोरण आखले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या व्यासपीठावरून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर कडाडून हल्ला केला होता. सिंधू पाणीवाटप करारातील तरतुदीही भारतीय प्रशासन आता तपासून पाहू लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या "सार्क'च्या परिषदेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.

"दक्षिण आशियाई विभागाचा विकास आणि परस्पर सहकार्य याविषयी भारत कटिबद्ध आहे; पण हे सर्व दहशतवादमुक्त वातावरणातच होऊ शकते. या भागातील एक राष्ट्र दहशतवादमुक्तीच्या प्रयत्नांच्या विरोधात काम करत आहे. गेल्या काही दिवसांतील घटना आणि घडामोडी पाहता इस्लामाबादमध्ये आयोजित "सार्क'च्या परिषदेमध्ये भारत सरकार सहभागी होऊ शकत नव्हते. "सार्क'चे सध्याचे अध्यक्ष असलेल्या नेपाळलाही याची कल्पना दिली आहे. सीमेपलीकडून हल्ले होत असताना दहशतवादमुक्त परिषद घेता येऊ शकत नाही,' असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com