सचिन, सोनूचे 'क्रिकेट वाली बीट' व्हायरल

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

सचिनसोबत 1992, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 मध्ये खेळविण्यात आलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत सचिनसोबत खेळलेल्या सर्व क्रिकेटपटूंची नावे या गाण्यात घेण्यात आली आहे.

मुंबई - क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची भंबेरी उडविणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता स्टुडिओमध्ये चक्क माईक हातात घेऊन गाणे म्हणताना दिसला.

सचिन तेंडुलकर आणि गायक सोनू निगम यांनी गायलेले 'क्रिकेट वाली बीट' गाणे सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. इंडियन आयडॉलच्या मंचावर सर्वप्रथम हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. सचिनने प्रथमच एखादे गाणे गायले आहे. सचिनच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सचिनसोबत 1992, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 मध्ये खेळविण्यात आलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत सचिनसोबत खेळलेल्या सर्व क्रिकेटपटूंची नावे या गाण्यात घेण्यात आली आहे. सचिनने या गाण्यात व्हिव्हिएस लक्ष्मण, राहुल द्रविड, कपिल देव, संजय मांजरेकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी याच्यासह सर्वच क्रिकटपटूंचे ना घेण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे इन्दूरचा क्रिकेटपटू अमेय खुरासियाचेही नाव घेतले आहे. खुरासिया 1999 च्या विश्वकरंडकात भारतीय संघाचा सदस्य होता. पण, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

व्हिडीओ गॅलरी