व्यक्तिगत माहितीची कंपन्यांना विक्री; राज्यसभेत मुद्दा उपस्थित

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

नवी दिल्ली - नागरिकांच्या व्यक्तिगत माहितीची कंपन्यांना विक्री करणाऱ्या दलालांचा मुद्दा बुधवारी राज्यसभेत उपस्थित झाला. यावर सर्वच सदस्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.

शून्य प्रहरात समाजवादी पक्षाचे सदस्य संजय सेठ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ""काही कंपन्या नागरिकांना दूरध्वनी करून कर्ज देण्याचे अथवा अन्य योजना देण्याचे आश्‍वासन देत आहेत. दूरसंचार कंपन्यांकडून ही माहिती अन्य कंपन्यांना विकली जात आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून, गोपनीय माहितीची चोरी होण्याची शक्‍यता असल्याने सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी.''

समाजवादी पक्षाचे सदस्य नरेश अगरवाल यांनीही अशाप्रकारे मला दूरध्वनी आले होते आणि माझा क्रमांक त्यांना कुठून मिळाला, हे उघड केले नाही, असे सांगितले. काही देशातील गोपनीय माहितीच्या चोरीच्या घटना लक्षात घेता याविषयी ठोस पावले उचलायला हवीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी हा अतिशय गंभीर मुद्दा असून, अर्थमंत्र्यांपर्यंत ही बाब पोचवावी, अशी सूचना केली. यावर अर्थमंत्र्यांनी ही गंभीर बाब कळविण्यात येईल आणि सदस्यांकडे अशाप्रकारचे काही तपशील असल्यास त्यांनीही ते द्यावेत, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.