काळविटाचा मृत्यू नैसर्गिक- सलमान खान

Salman Khan
Salman Khan

जोधपूर - काळविटाच्या शिकारीप्रकरणी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचे निवेदन शुक्रवारी येथील न्यायालयामध्ये नोंदविण्यात आले. "काळविटाचा मृत्यू हा नैसर्गिक होता. त्यामुळे मी निर्दोष आहे,'' असे सलमानने जोधपूर न्यायालयापुढे शुक्रवारी सांगितले. 

तो म्हणाला, ""काळविटाला नैसर्गिक मरण आला, असे डॉ. नेपालिया यांनी शवविच्छेदनाच्या अहवालात म्हटले आहे, तो अहवालच खरा आहे. बाकी सर्व पुरावे खोटे आहेत.'' जोधपूर येथील दंडाधिकाऱ्यांनी सलमानला 65 प्रश्‍न विचारले. या प्रश्‍नांपैकी बहुसंख्य प्रश्‍नांना सलमान याने "गलत' असे उत्तर दिले. काळविटाच्या शिकारीप्रकरणी न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारावर हे प्रश्‍न विचारण्यात आले होते. ""तुम्ही काळविटास गोळी घातल्याचे दोन जणांनी पाहिले आहे,'' असे मुख्य दंडाधिकारी दलपत सिंह राजपुरोहित यांनी सांगितले. यावरही सलमान याने "गलत', अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसरा प्रश्‍न सलमानने पिस्तूल विनापरवाना आहे हे याची सत्यता तपासणारा दुसरा प्रश्‍न विचारण्यात आला. 

"सलमानच्या जीपमध्ये रक्ताचे डाग व काळविटाचे केसही आढळून आले आहेत, असे न्यायालयाने म्हटले. त्यालाही सलमानने नकार दिला. "तुम्ही रात्री शिकारीसाठी गेला होतात का?' या प्रश्‍नालाही हे चुकीचे आहे, असे उत्तर दिले. सलमान न्यायालयात आपल्या वकील आनंद देसाई व अन्य वकिलांसह उपस्थित होता. सलमान आज सकाळी सव्वाआकराच्या सुमारास न्यायालयात पोचला. न्यायालयात सुनावणीच्या वेळी सलमानने बहुतेक वेळा निळा शर्ट व जिन्स असा वेश केला होता. आताही तो याच वेशात होता. सलमान याच्याशिवाय सैफ अली खान, तब्बू, नीलम व सोनाली बेंद्रे यांचेही निवेदन या वेळी नोंदविण्यात आले. 

या प्रकरणी 28 साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे तयार केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे या पाचही कलाकारांना विचारण्यात आली. सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत म्हणाले, ""सलमाने सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे विश्‍वासाने दिली आहेत. अर्धा तास त्याची सुनावणी झाली. तो बाहेर आल्यानंतर अन्य चार अभिनेत्यांना प्रश्‍न विचारण्यात आले.'' 

काळवीट शिकारप्रकरणी आपण निर्दोष असून, यात आपल्याला नाहक गोवण्यात आले आहे, अशी बाजू सलमानने मांडली. यात आपल्याला दोषी ठरवू नये, अशी विनवणी त्याने केली. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सुरक्षा असल्याने आपण कधीही शिकारीसाठी गेलो नव्हतो. आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आपण पुढील सुनावणीच्या वेळी पुरावे सादर करू, असेही त्याने न्यायालयाला सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

...असे आहे प्रकरण 
"हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी म्हणजे 1 ऑक्‍टोबर 1998 रोजी सलमान व इतर अभिनेत्यांनी वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय, सलमान याच्याविरोधात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याचा व वापरल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी, गेल्या 18 जानेवारी रोजी दंडाधिकाऱ्यांनी सलमान याला सर्व आरोपांमधून मुक्त केले होते. 102 पानी निकालपत्रात न्यायालयाने या प्रकरणात त्याला निर्दोष घोषित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com