'यूपी'मध्ये उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू 

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

लखनौ : उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील आलमपूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या 38 वर्षीय उमेदवाराचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (रविवारी) सकाळी निधन झाले. 

चंद्रशेखर कनौजिया असे मृत्यू झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. कनौजिया यांच्या मृत्यूनंतर निवडणूक आयोगाने येथील निवडणूक स्थगित केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी टी. व्यंकटेश यांनी आज ही माहिती दिली. 

कनौजिया हे निवडणुकीचा प्रचार करीत होते. या मतदारसंघातील साबितपूर भागात ते प्रचार करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिथे पोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.