समाजवादी पक्ष नेत्याची गोळ्या घालून हत्या

पीटीआय
सोमवार, 22 मे 2017

बलीया (उत्तर प्रदेश)- दोन मोटार सायकलवरून आलेल्या चौघांनी समाजवादी पक्ष नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना गोपालपूर बघौत या गावाजवळ घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेर सिंग असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. रविवारी (ता. 21) रात्री ते एक विवाह समारंभ उरकून मित्रासोबत घरी परतत होते. यावेळी दोन मोटार सायकलवरून आलेल्या चौघांपैकी एकाने जवळून त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुमेर सिंग यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, सुमेर सिंग गावचे माजी सरपंच व समाजवादी पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांची पत्नी सध्या ग्राम प्रधान आहेत.